शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द काढले. सत्तारांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभर वाद पेटलेला दिसून आला. या वादात आता उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतलीय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे.